Patient Pudhari
सोलापूर

Solapur Health News : रूग्णांना द्यावे लागते पदरचे दीड हजार

खासगी ॲनोमली केंद्रात सोनोग्राफीसाठी घेतात अडीच हजार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महिला व नवजात शिशू रुग्णालयातील ॲनोमली सोनोग्राफी केंद्र बंद आहे. यामुळे, सोनोग्राफी करण्यासाठी रूग्णांना खासगी केंद्रात जावे लागते. तेथे अडीच हजार रुपये द्यावे लागते. तर या सोनोग्राफीसाठी शासनाकडून गरोदर मातेला फक्त हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात गरोदर मातेला व त्यांच्या नातेवाईकांना पदरचे दीड हजार रुपये द्यावे लागते. दीड हजार रुपये वाचण्यासाठी येथील महिला व नवजात शिशु रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा सुरू करण्याची गरज आहे.

ॲनोमली सोनोग्राफीद्वारे गर्भातील बाळाची व्यंगाची तपासणी केली जाते. ती केल्यानंतर या अहवालातून गर्भातील बाळांमध्ये कोणते गंभीर व्यंग आहे का, हेही कळते. म्हणूनच ही सोनोग्राफी प्रत्येक गरोदर महिलेची केली जाते. अलिकडे सर्वच गरोदरमातेची ही तपासणी करण्यात येते. हे रुग्णालय महिला आणि नवजात शिशु यांचेच असल्याने येथे ॲनोमली या आधुनिक सोनोग्राफी मशीनची गरज आहे. यासाठी रुग्णालय जिल्हा प्रशासनाकडून देखील गतीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ॲनोमली सोनोग्राफीमुळे गर्भातील बाळाचे व्यंग आहे, हे कळते. येथील हे मशीन बंद आहे. येथे या यंत्रणेची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आला आहे.
- जयश्री ढवळे, वैद्यकीय अधीक्षक महिला व नवजात शिशु रूग्णालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT