सोलापूर : शासकीय रूग्णालयाच्या परिसरात अंधूक प्रकाशात जेवताना रूग्णांचे नातेवाईक. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : रुग्णांच्या नातेवाईकांचे शासकीय रूग्णालयात हाल

बसून जेवता येईल, अशी स्वच्छ जागा हवी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील अनेक गावांतील रुग्ण येतात. सोबत त्यांचे नातेवाईकही असतात. बहुतांश रुग्णांना न्याय वैद्यक शास्त्र विभागाच्या इमारतीसह नवीन बी ब्लॉकमधील आंतररुग्ण विभागात उपचारासाठी दाखल केले जाते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांचे हालच हाल होतात.

जेवण करण्यासाठीची जागाही उपलब्ध नाही. पावसाळ्यात तर खूप हाल होतात. हॉस्पिटल परिसरातील अंधूक प्रकाशात जेवण करावे लागते, तेही मिळेल त्याठिकाणी. प्रकाशाची सोय नसल्याने रुग्णांचे नातेवाईक कमी व अंधूक प्रकाशातच बसून जेवण करत असल्याचे विदारक चित्र शासकीय रूग्णालय परिसरात अनेक वेळा दिसून येते. यामुळे रात्री याठिकाणी उच्च प्रकाशाची दिव्यांचीही सोय नाही. यामुळे त्यांना अंधूक प्रकाशातच बसून जेवण करावे लागते.

शिवाय, पावसाळ्यात पाऊस असेल तर त्यांना बसून जेवण करण्यासाठी चांगली जागा नाही. शहर-जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. न्याय वैद्यक शास्त्र विभागाच्या इमारतीसह नवीन ब्लॉकच्या आंतररुग्ण व रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छ जागा तयार करून तेथे किमान जेवणासाठी जागा उपलब्ध असावी, अशी मागणी होत आहे. रूग्णालयात रोज शेकडो रूग्ण व नातेवाईक थांबत असतात. त्यासाठी सोय आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT