सोलापूर : पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा विभागातील दोनशे कर्मचार्यांनी सहभाग घेत पंढरपूर शहर स्वच्छ केले.
पंढरपूर शहरात आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्यणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुुमार आशीर्वाद, सीईओ कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत हे अभियान राबविले. मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, शशिकांत भोसले, नागनाथ बिराजदार, सारिका आकूलवार, तपन डंके, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.