सोलापूर

Solapur Panchayat Raj Campaign : पंचायतराज अभियानात चिंचणी प्रथम

उंदरगाव दुसरे, चिणकेला मिळाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्‍कार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियान जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत ५० लाखांचे पारितोषिक मिळवले. करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ३० लाख रुपये, तर सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले. तिन्ही गावांनी उल्लेखनीय कामगिरी करीत जिल्हा परिषदेला दिवाळीची गोड भेट दिली आहे. ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे या पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे टप्प्याटप्प्याने मूल्यमापन करण्यात आले.

प्रथम तालुकास्तरीय समितीने प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड केली. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या मूल्यमापनातून पात्र ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली. या प्रक्रियेनंतर गुणांकनाच्या आधारे पुरस्कारार्थी ग्रामपंचायती निश्चित करण्यात आले आहे.

ग्रामविकासमंत्र्यांच्‍या हस्‍ते होणार सन्‍मान

पुरस्कार वितरणासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री आणि राज्यमंत्री यांना निमंत्रित करून पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT