Cyber Fraud Pudhari
सोलापूर

Solapur cyber fraud: लिंक पाठवून खात्यातले 95 हजार लंपास

मोबाईलवर मेसेजद्वारे लिंक पाठवून खात्यातील 95 हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मोबाईलवर मेसेजद्वारे लिंक पाठवून खात्यातील 95 हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय शरणकुमार लिंबाळे (रा. पनाश अपार्टमेंट, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते वापरत असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयित आरोपीने मेसेजद्वारे लिंक पाठवली. त्यातून त्याने अजय यांच्या बँक खात्यातील 95 हजार रुपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केली. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा आर्थिक फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT