सोलापूर : येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास ५ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. १९) २८ हजार २२८ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली.
बुधवारी कमाल साडेपाच हजार, तर सर्वसाधारण दोन हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्यास मिळाला. कांद्याच्या कमी आवकेमुळे कांद्याला चांगला दर मिळत आहे. दरम्यान, एक नंबर कांद्याला पाच हजारांपेक्षा जास्त दर मिळत आहे, तर सरासरी दर तीन हजारांच्या आसपास आहे. मात्र, काही मालासच साडेपाच हजार भाव मिळत असल्याने उत्पादकांत नाराजी आहे.
उलाढाल तब्बल चार कोटींची
सोलापूर बाजार समितीत १४६ ट्रक कांद्याची आवक झाली. त्याच्या लिलावातून ४ कोटी २३ लाख ७४ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.