Onion market crisis Pudhari
सोलापूर

Onion market crisis: कांदा दराचा वांदा कधी संपणार

१,५८० रुपयांच्या खरेदीतून उत्पादन खर्चही निघेना

पुढारी वृत्तसेवा
संगमेश जेऊरे

सोलापूर : ‘नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ आणि ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ आता थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १,५८० रुपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी केली जाणार आहे. परंतू या किमतीतून कांदा उत्पादनाचे खर्चही निघेना.

खत, शेत मशागत, कांदा बी, काढणी खर्च, वाहतूक यामुळे कांदा लावणी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यात भाव नसल्यामुळे कांदा दराचा वांदा संपणार कधी असा सवाल कांदा उत्पादकांमधून व्यक्त केला जात आहे.

खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. पंरतू कांदा उत्पादनासाठी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून कांदाला अपेक्षित दर मिळाला नाही. तर दुसरीकडे सन २०२५ या खरिप हंगामातील कांदा ही अतिवृष्टीने कुजला. अद्याप कांद्याचा पीक विमाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

नाशिकमध्ये खरेदी सुरू पण सोलापुरात कधी

शेतकरी प्रतिकुल परिस्थिती असतानाही योग्य दर मिळेल या अपेक्षेतून कांदा लागवड करीत असतो. पण पदरी निराशाच येते. आता कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये आज सोमवारपासून (दि. ८ जून ) नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये ही थेट खरेदी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे. परंतू नाशिक, लासलगांव नंतर सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाने कांदा खरेदी कधी सुरु होणार असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांधमून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT