Solapur Temperature pudhari photo
सोलापूर

Solapur Temperature : सोलापुरात ऑक्टोबर हिटचा तडाखा

४ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंतच्या संपूर्ण महिन्यात शहराचे तापमान सतत ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : परतीच्या पावसाची आस लागलेली असतानाच शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी सोलापूरचे तापमान ३७ अंशावर गेल्याने नागरीकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. यंदा ४ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंतच्या संपूर्ण महिन्यात शहराचे तापमान सतत ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहिले.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काही भागात पाऊस झाला खरा पण तो तुरळक प्रमाणात होता.​वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून खरीपाची उभी पिके करपून गेली आहेत. येत्या फेबु्रवारीपर्यंत तापमान अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे यंदाचा थंडीही गायब होण्याबरोबरच येणारा उन्हाळाही अधिक कडाक्याची राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ​येत्या काही दिवसात तापमान चाळीस अंशांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. ऐन हिवाळ्याच्या तोंडावर सोलापूरला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

मागील पाच दिवसांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये : २ ऑक्टोबर - ३७. १ ऑक्टोबर - ३६.८. ३० सप्टेंबर - ३५.४. २९ सप्टेंबर - ३१.६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT