Nurse  pudhari photo
सोलापूर

Nursing Exam Fee Waiver : नर्सिंगचे २.४४ कोटी परीक्षा शुल्क माफ

सोलापूर जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा मिळेल फायदा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नर्सिंगच्‍या पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्‍या पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे. राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाने (MSBNPE) जवळपास २ कोटी ४४ लाख रुपयांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शहर -जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी नर्सिंग स्टुडंट्स वेल्फेअर फाऊंडेशनकडून करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शुल्कमाफीची मागणी करण्यात आली होती.

फाऊंडेशनच्या या निवेदनाची दखल घेत शुल्कमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर गेल्या १० नोव्‍हेंबर रोजी शासन निर्णयासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. सोमवार (दि. २३) रोजी मंडळाने अधिकृत परिपत्रक जारी केले. या पाठपुराव्यात फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार कातकडे, उपाध्यक्ष सुशांत चौरे, सचिव श्रेयस घालमे व प्राचार्य डॉ. मनिषा शिंदे यांनीही प्रयत्न केले.

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. शासनाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतल्याने याचा शहर-जिल्ह्यातील किमान दहा हजारांहून अधिक शासकीय व निमशासकीय संस्थेत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.
डॉ. मनिषा शिंदे, प्राचार्या, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT