सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकरणात गटशिक्षणाधिकार्याने मोघम अहवाल दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक दोन शाळेस अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शाळेतील परिसर अस्वच्छ, शालेय पोषण आहार निकृष्ट, शाळेची दुरवस्था झाल्याचे दिसले होते. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांना शाळा आणि परिसर व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच काही दिवसांनी भेट देणार असल्याची सांगितले होते. त्याप्रमाणे सीईओ आव्हाळे यांनी शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी शाळेच्या दोन्ही मुख्याध्यापकांनी काहीच कामे केले नव्हती. त्यामुळे सीईओ आव्हाळे यांनी मुख्याध्यापकांना नोटीस दिली होती. तसेच निलंबन करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी शिक्षकांना निलंबित केले नाही.
नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. त्या शाळेतील अहवाल उत्तर सोलापूर गटशिक्षणाधिकारी यांनी मोघम दिला आहे. त्यामुळे त्यांना नोटीस दिली आहे. तसेच अहवाल पुन्हा देण्यास सांगितले आहे. अहवाल दोषी असल्यास नान्नज येथील शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक