सोलापूर : येथील सामाजिक न्याय भवन या कार्यालयाच्या इमारतीत सहाय्यक आयुक्त, जात पडताळणी, सहाय्यक संचालक इतर मागास व बहुजन कल्याण यासह सामाजिक न्याय विभागाचे विविध महामंडळाचे कार्यालये आहेत. या कार्यालयात शहर व जिल्ह्यातील अनेक जण विविध कामासाठी येत असतात. पण, इमारतीच्या खाली कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाकड्याचीही सोय नाही. बाकड्यांना पेव्हर ब्लॉकचे आधार देण्यात आले आहेत. यामुळे त्यावर बसता येत नाही.
येतील सामाजिक न्याय भवनच्या इमारतीत वसंतराव नाईक, इतर मागास वर्गीय विकास महामंडळासह दिव्यांग कल्याण महामंडळाचेही कार्यालये आहेत. या कार्यालयांना रोज शहर व ग्रामीण भागातील शेकडो उपेक्षित घटकातील नागरिक विविध कामांसाठी येतात. अनेक वेळेला एखादा अधिकार्यांचे वाट पहात थांबावे लागते. वाट पहात थांबलेल्यांना बसण्यासाठी या इमारतीच्या खाली बसण्यासाठी धड चांगले बाकडे सुध्दा नाहीत.