हायवेलगत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने असे प्रचंड कारंजे उडत होते. 
सोलापूर

Solapur News : सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, पाण्याच्या दबावाने मोठा कारंजा, लाखो लिटर पाणी वाया!

माढा तालुक्यातील मौजे वेनेगाव जवळील घटना,

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : - उजनी धरणातून सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी माढा तालुक्यातील मौजे वेनेगाव येथे हायवेच्या जवळ व्हॉल्व खराब झाल्यामुळे फुटली आहे.यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे पाण्याचे उंच फवारे उडाले.

यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० वा.सुमारास घडली. उजनी धरणातून सोलापूर शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन (जलवाहिनी) टाकलेली आहे. ही पाईपलाईन जुनी झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी सतत फुटत आहे.यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.शनिवारी सकाळी वेनेगाव येथील व्हॉल्व खराब झाल्याने अचानक प्रचंड मोठे पाण्याचे कारंजे उडू लागले.

यामुळे बघ्यांची गर्दी झाली.पुणे सोलापूर महामार्गाच्या जवळून ही जलवाहिनी टाकण्यात आल्याने वाहने उभी करून नागरिक पाण्याचे फवारे बघण्याचा आनंद लुटत होते. मोडनिंब महामार्ग सुरक्षा पथकास या घटनेची खबर मिळाल्याने सपोनि उमेश पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतुकीस होणारा व्यत्यय दूर करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी लहान मुलांनी पाण्याच्या कारंजाचा आनंद ही लुटला. पाणी लिकेज झाल्याची माहिती मिळताच तासाभरात पंप हाऊस बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत शेतात पाणी शिरल्याने त्या ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले. कुणाच्या घरात तर कुणाच्या पिकात पाणी घुसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT