Solapur News Pudhari Photo
सोलापूर

Solapur News: सोलापूर अस्वच्छ; सांडपाणी, घनकचऱ्याचा निधी जातो कुठे?

विधिमंडळ अंदाज समितीने विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विधी मंडळ अंदाज समितीने शुक्रवारी सकाळी गणेश बिल्डर सोसायटीसह होटगी रोडवरील सिमेंट रस्ते, विडी घरकुल वसाहतीसह बाळे परिसराची पाहणी केली. यात परिसरासह शहरातील अन्य भागात घनकचरा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याचा मुद्दा प्रकर्षाने समितीच्या सदस्यांना आढळून आला.

सांडपाणी, घनकचऱ्यासाठी निधीचे नियोजन असताना अमंलबजावणी का केली नाही, निधी जातो कुठे असा सवाल उपस्थित करत आ. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने जाब विचारला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत माहिती मागवली. शहारात बांधकामासाठी नवीन एफएसआय वाढवून परवानगी दिली जाते. परंतू त्या इमारतीच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची असा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे.

महिला हॉस्पीटल ते साखर कारखाना असलेल्या रस्त्याला पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची मुदत असतानाही सिमेंट रस्ता करण्यावरुन संबंधित विभागाला जाब विचारुन माहिती मगितली आहे.

महापालिकेचा कॅगचा अहवाल मागविला

सोलापूर महानगरपालिकेच्या मागील पाच वर्षांचे कॅगचे लेखा परीक्षण अहवाल समितीने मागविले आहेत. तसेच मागील दोन वर्षांचे महापालिकेचे अर्थसंकल्पाच्या प्रती मागविल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) बैठक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT