सोलापूर : शहरातील एमआयडीसी परिसरातील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. या विवाहितेच्या आईने संपूर्ण प्रकार उघडकीस आणल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. गायत्री संतोष विटकर (वय 25, रा. भाग्यश्रीनगर, गवळी वस्ती, एमआयडीसी, सोलापूर) असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत. गायत्री ही मंगळवारी (दि.28) दुपारी राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळल्याने पती संतोष विटकर याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत दाखल आहे.
त्यानंतर बुधवारी (दि.29) सकाळी सुमारास जयश्री हिची आई सत्यम्मा कानिफनाथ गोखले यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून गायश्री हिला बुधवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता उपचारासाठी पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गळफास घेतल्यानंतर गायत्रीला शासकीय रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून घरी आणले. तिच्या आईला हि माहिती समजल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पंरतु तोपर्यंत उशीर झाला होता. गायत्री गळफास घेतल्यानंतर ती मृत पावली असेल किंवा ती बेशुध्दावस्थेत असताना वेळेत उपचार झाले असते तर ती वाचू शकली असती असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यामुळे गायत्रीचा नवरा संतोष विटकर आणि त्याचे कुटुंबिय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नोंदच केली नाही
गायत्री हिने गळफास घेतला असतानाही पती संतोष याने मंगळवारी शासकीय रुग्णालयात आणल्यावर तशी नोंद केली नाही. त्यानंतर तेथून लागलीच तिला कनकी हॉस्पिटल येथे नेले. तेथून पुन्हा मेट्रो हॉस्पिटल येथे आणले. तेथील डॉक्टरांनी रात्री नऊ वाजता घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे गायत्रील बेशुध्दावस्थेत घरी नेले. हा प्रकार समजल्यानंतर गायत्रीच्या आईने बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत सांगितली.