मंद्रुप : इंदिरा नगर येथे पडलेला जीवघेणा खड्डा. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News | भंडारकवठे-मंद्रुप रस्त्यावर पडला जीवघेणा खड्डा

खड्ड्यामुळे घडत आहेत अपघात

पुढारी वृत्तसेवा

भंडारकवठे : मंद्रुप ते भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर ) दरम्यानच्या रस्त्यावरील इंदिरा नगर येथे जीवघेणा खड्डा पडला आहे. पावसाळ्याच्या पूर्वीपासून पडलेल्या या खड्ड्याच्या दुरुस्तीची तसदी बांधकाम विभागाने घेतली नाही. या खड्ड्यामुळे अपघात घडत आहेत. याची दुरुस्ती वेळीच होण्याची गरज आहे.

मंद्रुपच्या इंदिरा नगरमधील सांडपाणी येथील रस्त्यावर येते. याच पाण्यामुळे हा मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यामुळे येथून ये-जा करणार्‍यांना त्रास होत आहे. हा खड्डा चुकवताही येत नाही. चुकवण्याचा प्रयत्न केल्यास वाहन थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यातच जाते. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मोठ्या अपघाती घटनांची वाट हे प्रशासन पाहाते की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. वेळीच याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भंडारकवठेसह विंचूर, निंबर्गी, सादेपूर, तेलगाव-भीमा यासह अन्य गावांतील नागरिकांनी दिला आहे.

या रस्त्यावरून किमान दहा ते पंधरा गावांतील नागरिकांना ये-जा करावी लागते. शिवाय, कर्नाटकातील चडचण परिसरातील लोकांचीही येथूनच वर्दळ आहे. याची दुरुस्ती करण्यात दिरंगाई होत राहिल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- भीमाशंकर बबलेश्वर, सरपंच, भंडारकवठे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT