MLC Election pudhari photo
सोलापूर

Solapur MLC Election: भाजपकडून राऊत की परिचारक याची उत्सुकता

विधान परिषद उमेदवारी दाखलचा आज शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर: विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. 1) शेवटचा दिवस असून, भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. तर महायुती व महाविकास आघाडी उमेदवारांची नावे आज जाहीर करणार आहे. भाजपकडून उमदेवारी कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी आ. प्रशांत परिचारक यांचे नाव भाजपकडून निश्चित मानले जात असतानाच शनिवारी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज नेल्याने सस्पेन्स वाढला आहे. प्रशांत परिचारक यांनी मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत आ. समाधान अवताडे यांच्या मागे राजकीय ताकद उभी करून निवडून आणले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. तर राजेंद्र राऊत यांनी विधानसभेत पराभूत होऊनही स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

खा. प्रणिती शिंदे यांनी ही जागा काँग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून रमेश बारसकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. माळशिरसमधून आ. उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. भाजपात प्रशांत परिचारक, शहाजी पवार, राजेंद्र राऊत यांच्या समर्थांकांमध्ये उमेदवारीबाबत सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT