Chandrashekhar Bawankule Pudhari
सोलापूर

Solapur Additional Collector Office: सोलापुरात होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रशासकीय कामकाजात वाढलेला ताण लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे. त्यामुळे सोलापुरात आता अपर जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे.

राज्यातील सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, पुणे (बारामती), सातारा, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढ असल्याने मंगळवारी (दि.10) महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत राज्यात अकरा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. महसूल विभागाशी संबंधित कामांचा ताणही आहे. त्यामुळे नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लागावीत, प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे, या उद्देशाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूलमंत्र्यांनी घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT