Dr. Shirish Walsangkar Death case Pudhari Photo
सोलापूर

Dr. Shirish Valsangkar Death Case: मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर चार डिसेंबरला सुनावणी

संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर शुक्रवारी (दि. 21) युक्तिवाद होणार होता. परंतु न्यायालयाने पुढील तारीख दिली असून आता चार डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद होणार आहे.

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. त्याचबरोबर वळसंगकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने शुक्रवारी (दि. 21) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने युक्तिवादासाठी पुढील तारीख दिली. त्यामुळे आता चार डिसेंबर रोजी दोन्ही बाजूचा युक्तिवाद होणार आहे.

सरकार पक्ष व तपास अधिकाऱ्यांनी सात नोव्हेंबर रोजी दोषमुक्तीचा अर्ज आणि सीडीआरबाबत म्हणणे सादर केले आहे. अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर सीडीआर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार असल्याचे सरकार पक्षाने सांगितले आहे. या खटल्यात मनीषा मुसळे-माने हिच्यातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत हे काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT