NEET Exam 2026 file photo
सोलापूर

Solapur NEET Retest: जिल्ह्यात साडेचार हजार विद्यार्थी उद्या देणार नीटची फेरपरीक्षा

१५ केंद्रावर जिल्‍हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-यूजी फेरपरीक्षा उद्या, रविवारी (दि.२१) होत आहे. जिल्ह्यातील चार हजार ५०७ विद्यार्थी १५ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्‍हा प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तीन मे रोजी नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटल्‍याने फेरपरीक्षा रविवारी होत आहे. वालचंद इन्‍टिट्यूट, सिद्धेश्वर हायस्‍कूल, दयानंद व वसुंधरा कॉलेजसह अन्य १५ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

परीक्षेत कोणत्याही केंद्रावर अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. प्रत्‍येक केंद्रावर दोन पुरूष व दोन महिला पोलिसांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्‍या सुरक्षेसाठी सीआयएसएफचा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.

प्रशासकीय पातळीवर विसंवाद

रविवारी होणाऱ्या नीट परीक्षा संदर्भात निवासी जिल्‍हाधिकारी अभिजीत पाटील आणि डीआयओ कार्यालयांशी दैनिक ‘पुढारी’च्‍या प्रतिनिधीने संपर्क केला. त्‍यावेळी निवासी जिल्‍हाधिकारी पाटील यांनी डीआयओकडे माहिती दिल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर डीआयओ यांच्‍याशी संपर्क सांधल्‍यानंतर निवासी जिल्‍हाधिकाऱ्याने माहिती दिली नसल्‍याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT