Pulse Polio File Photo
सोलापूर

Pulse Polio campaign: २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

सोलापुरात १.०६ लाख बालकांना पोलिओचे दोन थेंब

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रीय पल्‍स पोलिओ मोहीम अंतर्गत शहरातील एक लाख सहा हजार बालकांना 28 जूनपासून पोलिओचे दोन थेंब डोस देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८) जून रोजी देशभरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना तोंडावाटे पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक हजार १६० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर महानगर-पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष जोगदंड, डॉ. रोहन वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. पाटील, जिल्हा माता-बाल संरक्षण अधिकारी अविनाश मगर उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवार यांनी मनपा आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वीतेसाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील शाळांमार्फत पालकांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. तसेच शहरातील विविध लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या पात्र बालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT