विशेष रेल्वे  file photo
सोलापूर

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर-नागपूर विशेष रेल्वे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणार्‍या सोलापूरमधील अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सोलापूर-नागपूर विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दीक्षाभूमी येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर सोलापूर, पुणे, मुंबई चउमार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होणार असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर, पुणे, मुंबईदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.

विशेष रेल्वेत 18 आयसीएफ डबे

सोलापूर स्थानकावरून शुक्रवार (दि. 11) सायंकाळी सहा वाजता सोलापूर-नागपूर विशेष एक्स्प्रेस सुटेल. तर नागपूर येथे 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीस आठ-स्लीपर, सहा नॉनएसी जनरल चेअर कार, दोन-थ्री टियर, दोन-एसएलआर असे एकूण 18 आयसीएफ डबे असतील.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणार्‍या अनुयायांसाठी सोलापूर-नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे अनुयायांची सोय होणार आहे.
- योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT