file photo  
सोलापूर

सोलापूर : अत्याचारग्रस्त मुलीवर खुनी हल्ला; एपीआयसह चौघे निलंबित

backup backup

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. एका एपीआयसह दोन पीएसआय, एक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बुधवारी ही कारवाई केली.

एपीआय महारुद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पीएसआय राजेंद्र मंगरुळे डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे अरुण हेड कॉन्स्टेबल भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणारे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी ६ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर ५ मार्च रोजी दोघांनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने त्यांच्याविरोधात ५ मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा रात्री आठच्या सुमारास संशयित अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे पीडितेच्या घरी आले. हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच या हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली आहेत.

या हल्ल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली. तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारांनंतर आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संशयितांना तातडीने अटक न केल्याने चौघांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT