father killed daughter 
सोलापूर

Solapur crime news | प्रेम प्रकरणातून पोटच्या मुलीचा खुन,वडीलांवर खुनाचा गुन्हा दाखल

आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

वैराग : बार्शी तालुक्यातील रुई येथे १७ वर्षीय मुलीचे मुला सोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्याने मुलीच्या ओढणीने तिचा गळा जाणीवपूर्वक आवळून तिला जिवे ठार मारले. विष प्राशन केल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने जन्मदात्या पित्यावर वैराग पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रावणी राजेंद्र नरसुडे ( वय १७ वर्षे ३ महीने ) रा. रुई ( ता. बार्शी ) असे मयत मुलीचे नाव आहे. राजेंद्र लालासाहेब नरसुडे (रा. रुई) असे संशयित आरोपी गुन्हा दाखल जन्मदाता मुलीच्या पित्याचे नाव आहे. संशयित आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत तपास अंमलदार संदेश कृष्णदेव पवार, वैराग पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याने तीन महिन्याच्या खाकीवर्दीच्या तपासा नंतर गुन्हा दाखल केला गेला आहे. याबाबत हकीकत अशी की दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजण्याचे दरम्यान संशयित आरोपी पिता नरसुड़े यांनी त्यांचे राहते घरी रूई ( ता. बार्शी ) येथे मयत मुलगी श्रावणी हिचा तिचे दुसऱ्या मुला सोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून मयत मुलीचे ओढणीने तिचा गळा जाणीवपुर्वक आवळुन जिवे ठार मारले. मात्र तिला घरातील किटकनाशक औषध पाजून तिने आत्महत्या केल्याचा बनाव दाखवले. त्यानंतर मयताचे झालेले तपास, पंचनामा व वैदयकीय अहवालावरून मयताचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा अपघाती नसून तो मयत मुलीचे वडील राजेंद्र नरसूडे यांनी जाणीवपुर्वक गळा आवळुन खून केला.

मयत मुलगी वापरत असलेला मोबाईलमधील डाटा डिलीट करून पुरावा नाहीसा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुलीचे वडिल राजेंद्र यांचे विरूध्द सरकार तर्फे पोलिस पवार यांनी फिर्याद दिली आहे. सदरचा गुन्हा हा मयताचे चौकशीवरून दाखल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT