मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे मित्राचे आईबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून खून केल्याची घटना रविवारी (दि. 24) घडली आहे. नेताजी तानाजी नामदे (वय 32) असे मृत युवकाचे नाव आहे. विकास मारुती गुरव या आरोपीविरुद्ध मोहोळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी तपास करून बुधवारी (दि. 28) मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तानाजी तुकाराम नामदे (वय 58, रा. सौंदणे) यांनी मुलगा नेताजी 24 मे रोजी सकाळी 7.45 च्या सुमारास घरातून ज्वारी दळण्यासाठी गेला होता. परंतु परत आला नसल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दाखल केली होती. गावातीलच राहत असलेले इसम आदित्य वाघमारे याने नेताजी यास शेवटी विकास गुरव यांच्या घराजवळ सायकलवरून जाताना पाहिल्याचे सांगितले.
केला असता मृत नेताजी तुकाराम नामदे याने मोबाईलवरून विकास गुरव यास व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याची माहिती मिळाली. परंतु मोबाईल बंद करण्यात आला होता. फिर्यादी तानाजी तुकाराम नामदे यांच्या शंकेनुसार पोलिसांनी विकास मारुती गुरव यास ताब्यात घेतले. मित्रानेच आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. मृत देहाबाबत चौकशी केली असता शेतामध्ये पुरल्याचे सांगितले. याठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी मोहोळ यांच्या उपस्थितीत मृतदेह शेतामधून बाहेर काढण्यात आला.
पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा पेनूर बीट अधिकार्यांसह इतर अंमलदारांनी तत्परतेने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.