सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाने आपला गड पुन्हा एकदा मजबूत ठेवत महापालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या मतदारसंघातून भाजपाचे तब्बल 42 नगरसेवक विजयी झाले असून, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील रणनितीला मतदारांनी ठाम पाठिंबा दिला आहे. या यशात आमदार देवेंद्र कोठे यांचा क्षणोत्तर हस्तक्षेपही निर्णायक ठरला. त्यांनी दिलेल्या उमेदवारांना विजयश्री मिळाल्याने भाजपाच्या विजयात आणखी भर पडली आहे.
आमदार देशमुख आणि देवेंद्र कोठे यांच्या समन्वयातून उभारलेली संघटनात्मक ताकद निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली. प्रभाग सातचा अपवाद वगळता शहर उत्तरमधील जवळपास सर्वच प्रभागांत भाजपाच्या उमेदवारांनी बाजी मारली. एकूणच, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा विजय हा केवळ संख्याबळाचा नाही, तर नेतृत्व, रणनीती आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. आगामी काळात या काठावरच्या विजयांना भक्कम बहुमतात रूपांतरित करण्याचे आव्हान भाजपापुढे असणार आहे.