Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur municipal corporation: महापालिकेच्या वतीने ऑनलाईन जनगणनेला वेग

2800 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका कार्यक्षेत्रात जनगणना प्रक्रियेला गती देण्यासाठी 16 मे ते 15 जून या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून यंदा जनगणना पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 2,400 कर्मचारी आणि पर्यवेक्षक 400 अशा एकूण 2,800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या प्रशिक्षणास गुरुवारपासून (23 एप्रिल) हुतात्मा स्मृती मंदिरात चालू झाले आहे. हे प्रशिक्षण प्रक्रिया पुढील आठ दिवस चालणार आहे.

प्रशिक्षणात घराघरांत जाऊन माहिती संकलन करताना कोणत्या निकषांचा वापर करावा, अचूक व विश्वसनीय माहिती कशी नोंदवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती नोंदवली जाणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच नागरिकांशी संवाद साधताना सौजन्यपूर्ण वर्तन ठेवण्याचेही कर्मचाऱ्यांना बजावण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, उपायुक्त (जनगणना) तसेच सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आणि शशिकांत भोसले, अजित बांड उपस्थित होते.

डिजिटल प्रणालीद्वारे जनगणना

जनगणना ही पारंपरिक मॅन्युअली पद्धतीने न होता यावेळी डिजिटल प्रणालीद्वारे जनगणना केली जाणार आहे. एचएलओ या अँपद्वारे जनगणना केली जाणार आहे. 1 ते 15 मे या दरम्यान नागरिकांना स्व:ताहून ॲनलाईन प्रणालीवर ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून माहिती भरून देऊन जनगणना करता येणार आहे. तर 16 मे ते 15 जून या दरम्यान 400 कर्मचारी आणि पर्यवेक्षक घरोघरी घेऊन ऑनलाईन जनगणना करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT