सोलापूर

Solapur Municipal Corporation: महापालिकेच्या नव्या ई-बस ९ आणि १२ मीटर लांबीच्या

ऑनलाईन तिकीट सुविधाही उपलब्ध असणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूरसाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नव्या बसेसची लांबी ९ आणि १२ मीटर असून ऑनलाईन तिकीट सुविधाही उपलब्ध असणार आहे.

न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० ई-बस नागरिकांच्या सेवेत दाखल होतील. शहरासाठी मंजूर झालेल्या १०० बसेसमुळे नागरिकांची सुविधा होणार आहे. न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे बांधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून ‘बिहाइंड द मीटर’ (बीटीएम) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे जुलैअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित

वाहनतळासाठी आवश्यक असलेली ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया आदी सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे. उपकेंद्र व केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत.

पूर्वीप्रमाणे असावी रिंगरूट

पूर्वी शहरातून ठराविक वेळेला एक रिंगरूट बस असायची. जी संपूर्ण शहराच्या सीमारेषांना स्पर्श करत फिरायची. त्याचप्रकारे दोन बस एकमेकांविरूध्द दिशेला सोडाव्यात, ज्याचा अनेकांना फायदा होईल.

बैठकीत ई-बस संचालनासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या जेबीएम प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीसोबतच्या करारातील अटी-शर्तींवर चर्चा करण्यात आली. या करारानुसार बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इतर खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून सोलापूरकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
- विनायक कोंड्याल, महापौर, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT