Solapur municipal corporation Pudhari
सोलापूर

Solapur municipal corporation : महापालिकेकडून बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त

4 फेब्रुवारी रोजी नगररचना विभाग व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत बेकायदेशिर वॉलकंपाऊड जमिनदोस्त केले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेले बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी नगररचना विभाग व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत बेकायदेशिर वॉलकंपाऊड जमिनदोस्त केले. तर सैफुल सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांची पाहणी करून अतिक्रमणदारकांना 24 तासची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर दोन दिवसात या भागात मोहिम घेतली जाणार आहे.

महापालिकेची शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहिम चालु आहे. बेकायदा अतिक्रमण काढले जात आहे. मात्र मोहिमेच्या विरोधात मोठ्या प्रमणात तक्रारी वाढल्या आहे. अतिक्रमणच्या काढण्याच्या नावाखाली दुसरा उद्योग चालु असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान दोन दिवसात डिसीसी बँक परिसरात मोहिम घेण्यात आली. बुधवारी नगररचना विभागाच्यावतीने दिलेल्या पत्रानुसार महापालिकेच्या जागेवर म्हेत्रे टॉवर जवळ बेकायदा वॉल कंपाऊड बांधण्यात आले होते. ती काढण्यासाठी अतिक्रमण आणि नगररचना विभागाची संयुक्त मोहिम घेण्यात आली यामध्ये पुर्ण वॉलकंपाऊ जमिनदोस्त करण्यात आले.

अशी माहिती नियंत्रण अधिकारी डफन डंके यांनी दिली दमऱ्यान महापालिका आयुक्तांनी सैफुल परिसरात सर्व्हिस रोडवर अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरूवार पासून अतिक्रमणधारकांना आजपासून 24 तासांची डेडलाईन दिली जाणार आहे. याबाबत स्पिकरवरून सूचना केल्या जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण स्वतःहून हटवले नाही, तर पुढील दोन दिवसांत महापालिकेकडून विशेष अतिक्रमण मोहीम राबवून सर्व बेकायदेशीर टपऱ्या व अतिक्रमणे हटवली जाणार असल्याची माहिती नियंत्रण अधिकारी तफन डंके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT