Solapur Municipal Corporation | File Photo
सोलापूर

Solapur News : मिळकत कर भरण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ

ऑनलाईन एकरकमी भरल्यास करात ६ टक्के सवलत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महापालिकेने २०२६-२७ चा मालमत्ता कर भरण्यासाठी यापूर्वी ३० जून व ३१ जुलैपर्यंतची मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. मागील थकबाकीसह कर एकरकमी ऑनलाईन भरल्यास ६ टक्के, तर रोख किंवा धनादेशाने भरल्यास ५ टक्के सवलत आहे. या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कर भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. महापालिकेने ६ एप्रिल रोजी मालमत्ता कराची बिले संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती. तसेच एसएमएसद्वारे कर बिलांची लिंकही मिळकतधारकांना पाठविण्यात आली होती. काही ठिकाणी छापील बिलांचे वाटप करण्यात आले असले, तरी एसआयआर कार्यक्रमामुळे सर्व मिळकतधारकांपर्यंत छापील बिले पोहोचविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे बिलाची प्रतीक्षा न करता महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. फोनपे, गुगल पे तसेच इतर विविध पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT