सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉर्थ कोर्ट परिसरातील राजकीय वातावरण तापले होते. विविध पक्षाचे नेते मंडळी ठाण मारून होते एकूण दाखल झालेल्या 1230 उमेदवारी अर्ज पैकी दोन दिवसात 532 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये 102 जागेसाठी 698 उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी 23 ते अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कालावधीत 4 हजार 20 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली. एकूण 1460 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या सर्व अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. अर्ज छाननीत एकूण 230 अर्ज बाद झाले. तर उर्वरित 1 हजार 230 अर्ज वैध ठरले. गुरुवार 1जानेवारी शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
नॉर्थकोट प्रशाला येथे महापालिका निवडणुकीसाठी विविध 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज मागे घेण्यासाठी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी त्याचबरोबर संबंधित उमेदवार आणि सूचक यांची मोठी गर्दी झाली होती. अर्ज माघारी घेण्याच्या गुरुवारी पहिल्या दिवशी एकूण 33 उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर शनिवार दिनांक 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती शनिवारी तब्बल 532 विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता निवडणूक आखाड्यामध्ये 102 जागेसाठी 698 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या नगरसेवकांनी घेतली उमेदवारी माघार
कुमुद अंकाराम, सुजाता अकेन, वरदलक्ष्मी पुरुड, मनीषा हुच्चे, सारिका सुरवसे, मीनाक्षी कंपली, प्रभाकर जामगुंडे, उमेश गायकवाड, श्रीकांत घाडगे जगदीश पाटील, सुभाष शेजवाल, ज्योती बमगुडे, वैष्णवी करगुळे, राधिका पोसा, रामेश्वरी बिरू, नागेश वल्याळ, इंदिरा कुडक्याल, प्रतिभा मुदगल, बापू ढगे