Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur municipal corporation: महापालिकेची धडक मोहीम; 542 नव्या मिळकतींचा शोध

उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने तपासणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील महापालिकेच्या नोंदीबाहेर राहिलेल्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेली विशेष मोहीम वेगाने सुरू आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल 542 नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. शुक्रवारी (10 एप्रिल) राबविण्यात आलेल्या मोठ्या मोहिमेतच 200 हून अधिक नोंदणी नसलेली घरे आणि मिळकती समोर आल्याने महापालिकेच्या कर विभागात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शहरातील अनधिकृत अथवा नोंद नसलेल्या घरांचा आणि व्यावसायिक मिळकतींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध प्रभागांमध्ये पथकांकडून प्रत्यक्ष पाहणी, नोंदींची पडताळणी आणि मालमत्ता कर अभिलेखांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नव्या मिळकती आढळून आल्याने कर आकारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, मोहिमेदरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 18 कर्मचाऱ्यांना उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. कामचुकारपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे लपून राहिलेल्या मिळकती आता कर जाळ्यात येणार असून, महसुलात मोठी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT