Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation : महापालिकेतील ठेकेदारांची १० कोटींची बिले अदा

२८ कोटीपैकी १० कोटी रुपयांची बिले मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी तातडीने कार्यवाही करून संबंधित मक्तेदारांना दिली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नऊ महिन्यांपासून प्रलंबित महापालिका कामांची तब्बल २८ कोटीपैकी १० कोटी रुपयांची बिले मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी तातडीने कार्यवाही करून संबंधित मक्तेदारांना दिली.

महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि मुख्य लेखापाल डॉ. जवळगेकर यांचे आभार मानले. देयकांची वर्गवारी बदलून छोट्या ठेकेदारांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप करत बिले तातडीने अदा न केल्यास कामबंद आंदोलनाचा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला होता. मुख्य लेखापाल कार्यालयाने तातडीने दखल घेत १० कोटी रुपयांची बिले संबंधित मक्तेदारांना अदा केली आहेत.

महापालिका प्रशासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार देयकांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली आहे. मुख्य कार्यालयासह झोन क्रमांक १ ते ८ मधील मेंटेनन्स व इतर कामांचा समावेश ‘ब’ संवर्गात करण्यात आला. मात्र, ही कामे प्रत्यक्षात अत्यावश्यक स्वरूपाची असून त्यांना ‘अ’ संवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ते दुरुस्ती, चेंबर उचलणे, विसर्जन कुंडातील गाळ उपसणे यासारखी कामे तातडीने करावी लागतात. त्यासाठी कामगारांना रोजंदारीवर पैसे द्यावे लागतात. मात्र, दुसरीकडे बिले रखडल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे असोसिएशनने म्हटले होते. सुमारे दहा कोटी रुपयांची बिले बुधवारी अदा करण्यात आली आहेत. उर्वरित कार्यवाही नियमानुसार केली जाईल असे डॉ. जवळगेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT