Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation: इमारत परवानगीत नियमांचे उल्‍लंघन

९६ बेकायदेशीर बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरच संशयाची सुई

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या बांधकाम विभागातील ९६ कथित बेकायदेशीर बांधकाम परवान्यांचे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

अंत्रोळीकर नगरातील भगवान रेसिडेन्सी या नऊ मजली इमारतीला नियमांचे उल्लंघन करून बांधकाम परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील अंत्रोळीकर नगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत भगवान रेसिडेन्सी या भव्य नऊ मजली इमारतीभोवती आता वादाचे वादळ निर्माण झाले आहे. या इमारतीला बांधकाम परवानगी देताना अनेक नियम आणि अटी धाब्यावर बसवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कागदोपत्री नमूद करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षात करण्यात आलेले बांधकाम यामध्ये मोठी तफावत आहे. यातील विकासक रुपेश भांदुले यांनी महापालिकेकडून वापर परवानगी दिला जात नसल्याची तक्रार नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याकडे केली होती.

त्यानंतर असीम गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्याशी चर्चा केली. बैठकीला कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, कनिष्ठ अभियंता महेंद्र बोठे उपस्थित होते. यावेळी इमारतीतील विविध त्रुटी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्या. यापूर्वी ९६ कथित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, त्यांच्याच कार्यकाळात परवानगी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT