Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation : मनपा प्रशासनात कार्यालयीन कामकाजात खांदेपालट

६९ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापनेचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बुधवारी जारी केले.

या आदेशानुसार एकूण ६९ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर विविध विभागांत पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल झाले आहेत. महापालिकेच्या पदोन्नती समितीच्या २७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार यापूर्वी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानंतर आता संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या कार्यालयांत पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कार्यालय अधीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना कर आकारणी, मंडई, मुख्य लेखापाल, नगर अभियंता, सामान्य प्रशासन तसेच विविध विभागीय कार्यालयांत नियुक्ती देण्यात आली आहे. तर वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनांमध्येही विविध विभागांची अदलाबदल करण्यात आली आहे.

या पदोन्नती नंतरच्या पदस्थापना आदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. एकूण ६९ अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. १६ कार्यालयीन अधीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. जीएडी विभागात पेंढारी यांनी सुसूत्रीकरण केले.

सामान्य प्रशासन विभागात प्रभारी अधीक्षक रजाक पेंढारी यांनी कागदपत्रांचे सुसूत्रीकरण केले. अनुकंपा आणि लाड कमिटी प्रकरणे नियोजनपूर्वक नेटक्या पद्धतीने मार्गी लावली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवा पुस्तकांचे नेटके व्यवस्थिकरण केले. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, १०-२०-३० चा लाभ यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यवाही केली. त्यांची बदली पदस्थापना कर आकारणी विभागात झाली आहे. यामुळे पेंढारी यांना सामान्य प्रशासन विभागात आणखी काही काळ संधी देण्याची गरज वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT