Mumbai flight 
सोलापूर

Mumbai flight: मुंबईच्या विमानसेवेला तापमानाचा व्यत्यय

सोलापुरातून आता आठवड्यातून दोनच दिवस टेकऑफ घेणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गेल्या महिनाभरापासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, सरासरी तापमान 44 अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे विमान टेकऑफला अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर स्टार एअरची सोलापूर ते मुंबई विमानसेवा आता आठवड्यातून केवळ दोन दिवसच चालवली जाणार आहे. याची अंमलबजावणी ही येत्या एक मेपासून होणार आहे. 31 मेपर्यंत आठवड्यातून दोनच दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे.

तापमानात वाढ झाल्याने विमानाचा पेलोड अपेक्षित प्रमाणात घेता येत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्या पाश्वृभूमीवर आठवडातून ही सेवा मंगळवार आणि गुरुवार या दोनच दिवशी सुरू राहणार आहे. स्टार एअरने सुरुवातीला आठवड्यातील चार दिवसांसाठी विमानसेवा सुरू केली होती. त्यानंतर ही सेवा दररोज चालवण्यात येऊ लागली. मार्च महिन्यात पुन्हा चार दिवस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. आता वाढत्या उन्हामुळे दि. 31 मेपर्यंत ही सेवा आठवड्यातून केवळ दोन दिवसच सुरू राहणार आहे.

दि. 1 मेपासून स्टार एअरकडून तिरुपती तसेच पुण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होणार असल्याची चर्चा होती. परंतु त्याबाबत अद्याप तिकीट बुकींग सुरू झालेले नाही. ही विमानसेवा तिरुपती-सोलापूर-पुणे अशी सुरू होणार असून, पुणे येथे विमानतळावर तिरुपती विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध झाले आहे. सोलापूर ते मुंबई दरम्यानची थेट विमानसेवा दि. 15 ऑक्टोबर 2025 पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

सुरुवातीला आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या चार दिवसांत ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. सोलापूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या 50 ते 55 मिनिटांत पूर्ण होत आहे. प्रवाशांकडून या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT