solapur mumbai flights 
सोलापूर

Solapur Airport Services: आजपासून पुन्हा विमानसेवा

सोलापूर ते मुंबई : सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी सेवा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जूनपासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून आज रविवार, दि. २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत असून, ४५ हून अधिक प्रवाशांनी विमान तिकीट बुकिंग केले आहेत.

दृश्यमानतेच्या कारणावरून २८ जूनपासून स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली होती. या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. सोलापूरकरांनी ही सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, अद्यापही सोलापूर-गोवा विमानसेवा ही बंद राहणार आहे. बंद विमानसेवेबाबत मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन तत्काळ विमानसेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नोटीसही बजावली होती. आता मुंबई- सोलापूर विमानसेवा सुरू होत आहे.

कंपनीने त्यांचे ऑनलाईन बुकिंग काऊंटर सुरू करून २ ऑगस्टपासूनचे सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली होती. सुमारे ४५ हून अधिक जणांनी बुकिंग केले आहे. विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा दि. २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरपर्यंत राहणार असून त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्‍यान, तिकीट दर हे ४५०० रुपयेपर्यंत पोहोचलेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT