एसटीची स्मार्ट कार्ड योजना  pudhari photo
सोलापूर

Solapur News| एसटीचे स्मार्ट कार्ड हरवल्यास नवे कार्ड काढता येणार

​जुने कार्ड ब्लॉक करून १९९ रुपयांत नोंदणीची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांचे सवलतीतील प्रवासाचे स्मार्ट कार्ड हरवल्यास प्रवाशांना चिंता करण्याची गरज नाही. १९९ रुपयांतच नवीन कार्ड काढता येणार आहे. एखाद्या प्रवाशांचे एसटी स्मार्ट कार्ड हरवल्यास किवा चोरीला गेल्यास त्याने जुने कार्ड तत्काळ ब्लॉक करावी. १९९ रुपये शुल्क भरून नवीन स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून नव्याने कार्ड मिळवता येणार आहे.

सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. जुने कार्ड गहाळ झाल्यास त्याचा गैरवापर टाळण्यासाठी ते ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या १९९ रुपयांच्या नाममात्र शुल्कात नवीन कार्ड मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन बदलामुळे सवलतीच्या प्रवासाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.​

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT