Electric Shock Pudhari
सोलापूर

Solapur News | मोहोळ तालुक्यात विजेचा धक्का लागून बिटले येथे वायरमन गंभीर जखमी!

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील महावितरणच्या बिटले उपकेंद्रात काम करत असताना अचानक सुरू झालेल्या विज प्रवाहामुळे विजेचा जोरदार धक्का लागून पोलवरून वायरमन खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १२ रोजी घडली आहे. दत्तात्रय युवराज जाधव असे या जखमी वायरमनचे नाव आहे.

बिटले उपकेंद्रातील खांबावर वीजपुरवठा बंद केल्याची खात्री करून दुरूस्तीचे काम करत होते. त्यावेळी अचानक जोरदार विजेचा धक्का बसला.आणि ते पोलवरुन खाली पडले हा प्रकार घडताच सबस्टेशन मध्ये ऑपरेटर या पदावर ड्युटीवर असलेले पाटील व त्यांचे सहकारी यांनी त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी मोहोळ येथील एका खासगी दवाखान्यात आणले होते.

मात्र परस्थिती गंभीर असल्याने त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विजेचा पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विजपुरवठा चालू होण्यामागचे नेमके कारण काय याची महावितरणच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT