सोलापूर : नवऱ्यास सोडून माझ्याकडे ये म्हणत विवाहितेचा मोबाईल तसेच हॉल तिकीट, कॉलेज आयडी असलेली बॅग पळवल्याची घटना दयानंद कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये घडली.
शैलजा अमर गणपा (वय 21, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे. श्रीयांश शेखर राचर्ला (रा. जुना विडी घरकुल, सोलापूर) हा शैलजा हिला त्रास देत होता. शैलजा ही परिक्षा देण्यासाठी दयानंद कॉलेज येथे आली असता तू नवऱ्याला सोडून माझ्यासोबत लग्न कर, आपण पळून जाऊ अशी मागणी करुन लागला.
शैलजा हिने नकार दिल्यावर तिच्याकडील बॅग घेऊन तो पळून गेला. यामध्ये मोबाईल, कॉलेजचे आयडी कार्ड, हॉल तिकीट होते. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.