Solapur Mobile Theft Pudhari
सोलापूर

Solapur Mobile Theft: गहाळ झालेले 53 मोबाईल शोधले

ग्रामीण सायबर शाखेची कामगिरी; नागरिकांना केले परत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने तपास करून गहाळ झालेले तसेच चोरीचे सात लाख 85 हजार रुपयांचे 53 मोबाईल शोधून ते नागरिकांना परत करण्यात आले.

सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांच्या नेतृत्वाखाली गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सी. ई. आय. आर. पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल 53 मोबाईल शोध्ाण्यात त्यांना यश आले. त्याची किंमत सात लाख 95 हजार रुपये इतकी आहे.

पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सदर मोबाईल मूळ मालकांना परत देण्या आले. यावेळी नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमितकुमार करपे, जाधव यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT