Crime file photo
सोलापूर

Solapur Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरूणास १० वर्षे सक्तमजुरी

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दुर्गेश विजय भवाडे (वय २५, रा. उत्तर सदर बझार) या तरूणास विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुर्गेश भवाडे याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एप्रिल २०१६ मध्ये एका मंदिरात दुसऱ्यांदा लग्न केले. या कारणाने पहिल्या पत्नीने पीडितेशी भांडण केले. त्यामुळे पीडितने दुर्गेश याच्याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी केला. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश भस्मे यांच्यासमोर झाली. साक्षीदारांच्‍या साक्षी, सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली.

याप्रकरणी सरकारच्यावतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी नदाफ व काळे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT