Pudhari
सोलापूर

Solapur Crime: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावास

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी बार्शी सेशन कोर्टाने आरोपी लखन ऊर्फ बापू जोतिबा सावंत (वय 29, रा. सिद्धार्थनगर, माळशिरस) याला 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी हा निकाल दिला.

दि. 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 11 वाजता पीडिता घरात झोपली असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईने दुसऱ्या दिवशी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला घटनास्थळाजवळच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. पो. नि. गोपाळ पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT