ZP elections Pudhari
सोलापूर

Solapur ZP Election: मिनी मंत्रालयासाठी 24 लाख मतदार निवडणार कारभारी

उद्या मतदान : गटांसाठी 271, गणांसाठी 485 जण रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि 136 गणांसाठी उद्या, शनिवारी (दि. 7) मतदान होत असून, 24 लाख 45 हजार 227 मतदार मिनी मंत्रालयाचे कारभारी निवडणार आहेत. 68 गटांसाठी 271, तर 136 गणांसाठी 485 उमेदवार निवडणुकीच्या रिंणगात आहेत.

यंदा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपविरुद्ध अन्य पक्ष असा सामना रंगला. राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षांत काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या. या निवडणुकीसाठी 7 हजार 500 बॅलेट आणि 3 हजार 366 कंट्रोल युनिट लागणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

एकूण 2 हजार 758 मतदार केंद्रांपैकी 1 हजार 379 मतदान केंद्रांवर वेब कॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रांच्या साहित्याचे वाटपही त्या त्या तहसील पातळीवर शुक्रवारी, दि. 6 फेबु्रवारी रोजी होणार असून, त्या त्या तहसील पातळीवरच जि. प.च्या मतमोजणी 9 फेबु्रवारी रोजी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT