महापौर कोंड्याल  
सोलापूर

Solapur News| पत्रकारांच्या गृह प्रकल्पासाठी सहकार्य करणार : महापौर कोंड्याल

गृह प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून महापौरांनी दिली ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : देशातील ऐतिहासिक असा पहिलाच गृहप्रकल्प सोलापुरात केवळ पत्रकारांसाठी उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून म्हाडाअंतर्गत हा प्रकल्प साकारला जात आहे. अनेक वर्षांची पत्रकारांची स्वप्नपूर्ती होत आहे. यामुळे या गृह प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

विजापूर रस्त्यावरील पत्रकारांच्या गृह प्रकल्पास सोमवारी महापौर कोंड्याल यांनी भेट दिली. प्रकल्पातील सर्व इमारती व सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे उपअभियंता रौफ सरकाजी, उपअभियंता इदायत मुजावर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष उमेश कदम, रामेश्वर विभूते, बाळकृष्ण दोड्डी, विकास कस्तुरे, विक्रांत कालेकर, संगमेश जेऊरे, आमसिद्ध व्हनकोरे, अमोल कांबळे, योगेश कल्याणकर, कादर शेख, राजू बंडगर, महादेव मादगुंडी, भास्कर अल्ली आदींसह पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे, पत्रकार विनोद कामतकर यांच्या हस्ते महापौर कोंड्याल व अधिकाऱ्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

महापौरांनी पत्रकारांच्या गृह प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहे. सर्वांना सुख-सोयी मिळाव्यात, अशा दृष्टिकोनातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पत्रकारांनी जे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न साकारत आहे. पुणे-मुंबईमध्ये आपलं घर असायला पाहिजे, अशा पद्धतीचं काही लोकांचे स्वप्न असते, तरीदेखील आपल्या माय-माती सोलापूरमध्ये अतिशय हक्काचं, स्वतःच हक्काचं घर आज याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साकार होत आहे. याचा मनस्वी आनंद असल्याचेे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT