बार्शी : विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांतच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका रोहित घोंगडे (वय 32, रा. हनुमान मंदिर पान खुंट, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई केली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, प्रियांका यांचा विवाह रोहित राजेंद्र घोंगडे यांच्यासोबत दि. 28 मार्च रोजी आळंदी, पुणे येथे नोंदणी पद्धतीने पार पडला. विवाहानंतर त्या बार्शी येथे पती, सासू सुनंदा राजेंद्र घोंगडे व सासरे राजेंद्र घोंगडे यांच्यासह राहत होत्या. सुरुवातीचे काही दिवस सासरच्यांची वागणूक चांगली होती; मात्र त्यानंतर घरगुती कारणांवरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती, सासू व सासरे यांनी वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप प्रियांका यांनी केला आहे.
दि. 17 मे रोजी सायंकाळी क्षुल्लक कारणावरून सासू सुनंदा घोंगडे यांनी शिवीगाळ करत प्रियांका यांच्या केसाला धरून गळा दाबला व मारहाण केली.