सोलापूर

Solapur: मराठा युवकांनी साजरी केली काळी रंगपंचमी

महापौरपदापासून मराठा समाजाला डावलल्याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काळी रंगपंचमी साजरी करून महापौर निवडीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. महापौरपद हे सर्वसाधारण मराठा प्रवर्गासाठी आरक्षित असताना ओबीसी समाजातील नगरसेवकाची महापौरपदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने सुरू ठेवली आहेत. सुरुवातीला मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलनही केले.

या आंदोलनाची पुढील पायरी म्हणून रंगपंचमीच्या दिवशी काळी रंगपंचमी साजरी करून महापौर निवडीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी अंगावर काळा रंग लावून आणि काळे कपडे उडवत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात संताप व्यक्त केला. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी आक्रमक भूमिका मांडत सांगितले की, महापौर पद मराठा समाजासाठी आरक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवाराला महापौर करण्यात आले आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करून मराठा समाजातील नगरसेवकाला महापौरपद द्यावे, अशी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT