Solapur accident news  
सोलापूर

Solapur accident news | सोलापूर मंगळवेढा महामार्गावर बेगमपूरजवळ पिकअप आणि दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली

पुढारी वृत्तसेवा

कामती : सोलापूर–मंगळवेढा महामार्गावर भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास बेगमपूर (ता. मोहोळ) गावाजवळ घडला. धडकेनंतर दुचाकी काही अंतर फरफटत गेल्याने अपघाताची तीव्रता वाढली.

या अपघातात बोराळे (ता. मंगळवेढा) येथील योगेश प्रकाश शहा (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रकांत चन्नगोंडा पाटील (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही कामानिमित्त दुचाकीवरून बेगमपूरकडे गेले होते आणि काम आटोपून गावी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

घटनेची माहिती मिळताच कामती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच योगेश शहा यांचा मृत्यू झाला. चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातातील पिकअप वाहनाचा क्रमांक एमएच ४५ एएक्स ४५१९ असून दुचाकीचा क्रमांक एमएच १२ डब्लूएम ८४४४ आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला. वारंवार अपघात होत असल्याने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT