सोलापूर

Solapur news: मंगळवार बाजारात धडक कारवाई

मच्छीमार्केटमध्ये अतिक्रमण विभागाने केली 7 खोकीनिष्कासित

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील मंगळवार बाजार मच्छी मार्केट येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने अतिक्रमित बेकायदेशीर खोक्यांवर धडक कारवाई करत तब्बल 7 खोके निष्कासित केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

महापालिका मंडई अधीक्षक कार्यालयाकडून अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रान्वये सूचित करण्यात आले होते. त्यानुसार आज महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई हाती घेतली. मात्र, प्रत्यक्ष कारवाईवेळी कोणते खोके अधिकृत आणि कोणते बेकायदेशीर याबाबत स्पष्टता देण्यासाठी मंडई विभागाचे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी अनुपस्थित होते. यामुळे कारवाई दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला.

ही कारवाई सुरू होताच अनेक खोकेधारकांनी जुने दंड भरल्याच्या पावत्या दाखवत आपली खोके अधिकृत असल्याचा दावा केला. यावर विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी कडक भूमिका घेत, जुने दंड भरल्याच्या पावत्या दाखवून कारवाई टाळता येणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आणि मोहीम सुरूच ठेवली. दरम्यान, परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. सध्याच्या उन्हाच्या कडाक्यात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT