Solapur Gutkha Seized 
सोलापूर

Solapur Gutkha Seized: मंद्रूप पोलिसांकडून गुटख्यासह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरुवारी मंद्रूप पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक पकडून एकूण २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : गुरुवारी मंद्रूप पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक पकडून एकूण २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांना एक पांढऱ्या रंगाची एक्स.यू.व्‍ही. ५०० या गाडीमध्ये गुटखा घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, श्रीशैल शिवणे, मनोज राठोड यांच्यासह नांदणी येथे नाकाबंदी करण्यात आली.

एक संशयित वाहन नांदणी येथे थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. पोत्यात प्रतिबंधित गुटखा असल्याचे दिसून आले. ६ लाख ९३ हजारांचा गुटखा व १६ लाखांची कार असा एकूण २२ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास करंडे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, पोलिस नाईक सिकंदर मुल्ला, शिपाई श्रीशैल शिवणे, मनोज राठोड, माजिद शेख यांनी बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT