Pudhari
सोलापूर

Solapur Crime: मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

घरात झोपलेल्या 14 वर्षाच्या मुलीवर ती झोपेत असताना अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : घरात झोपलेल्या 14 वर्षाच्या मुलीवर ती झोपेत असताना अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. लखन उर्फ बापू ज्योतीराम सावंत (वय 25, रा. सिध्दार्थ नगर, माळशिरस) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

2024 मध्ये लखन सावंत याने पीडित मुलीच्या घरात घुसून ती झोपली असता तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तत्कालिन पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी लखन सावंत यास अटक करून घटनास्थळ पंचनामा, कपडे जप्ती पंचनामा, वैद्यकीय तपासणी, साक्षीदारांकडे तपास व पीडित हिचा कबुली जबाब घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील सेशन कोर्ट यांच्या समक्ष झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेने सांगितलेली घटना, तिच्या आईची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष एकमेकांस पूरक होत्या. त्याचबरोबर गावकऱ्यांनी आरोपीस लगेच पकडून पोलिसांच्या हवाली केले.

आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य केल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT